माझी कविता
माझी कविता
1 min
291
शेतकरी माझा बाप
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी देवा
कोरा राहील्य कशिदा
बाप हाकली वखंर
बैलाच्या पावलो गती
त्याला कळतच नाही
क्रिकेटच्या धावा अंती
बाप खेळतो रे जुवा
निसर्गाच्या संगतीन
कधी मिळेल का नफा
रक्ताचे पाणी करून
डोळे आकाशा कडे
पाहे पावसाची वाट
जमीनीले गेले तडे
पुर वाहे डोळ्या वाट
बाप माझा असा कसा
त्याची हिंमत रे न्यारी
पिक गेल वाहून तरी
दुबार पेरणीची तयारी
