STORYMIRROR

Ranjana Patil

Others

4  

Ranjana Patil

Others

माझे स्वप्न

माझे स्वप्न

1 min
442

पहिले आहे मी

सुंदर एक स्वप्न

स्वच्छ सुंदर भारताचे

रेखीले मी चित्र. !!१!!

माझ्या स्वप्नातील भारतात

एकत्र सर्व जाती धर्म वसू दे

नकोत भिंती धर्मा अधर्माच्या

नकोत तंटे जातीपातीचे !!२!!

स्वप्न एक मी पाहिले

देशाच्या ऐक्याचे अन् प्रगतीचे

बंद करा द्वारे इर्षेचे अन् द्वेषाचे

खुलू दे नित्यप्रगतीची अन् ऐक्याची दारे!!३!!

सप्नात मी पाहिले

उंच ध्वजा प्रगतीची अन् शांतीची

सुंदर माझ्या भारतमातेच्या 

यशाची नि कीर्तीची!!४!!

कीर्तीचा डंका माझ्या देशाचा

अवघ्या जगात वाजू दे

शिक्षण, आरोग्य अन तंत्रज्ञानाची

नित्य कास राहू दे!!५!!


Rate this content
Log in