दुरावा
दुरावा
1 min
252
आले होते शहरांमध्ये
मिळवायला भाकरी
भरण्या पोटाची खळगी
सोडून माझ्या मायदेशा!!१!!
हरविले मी स्वत:ला
माणसाच्या गर्दीच्या समुद्रामंदी
इथे पोटापाण्यासाठी जो-तो
रोजच पळतो पैशाच्या मोहापायी!!२!!
आज मिळविला मी पैसा
ऐसपैस गाडी नि बंगला
दारात राबती नोकर-चाकर
पण राहिली दूर माझी ती झोपडी!!३!!
पारखी झाले आज मी
त्या सुखाला जिथं बालपण गेले
मातेच्या मायेच्या पदराला
आज वंचित मी झाले!!४!!
