माझे स्वप्न
माझे स्वप्न
1 min
528
पहिले आहे मी
सुंदर एक स्वप्न
स्वच्छ सुंदर भारताचे
रेखीले मी चित्र. !!१!!
माझ्या स्वप्नातील भारतात
एकत्र सर्व जाती धर्म वसू दे
नकोत भिंती धर्मा अधर्माच्या
नकोत तंटे जातीपातीचे !!२!!
स्वप्न एक मी पाहिले
देशाच्या ऐक्याचे अन् प्रगतीचे
बंद करा द्वारे इर्षेचे अन् द्वेषाचे
खुलू दे नित्यप्रगतीची अन् ऐक्याची दारे!!३!!
स्वप्नात मी पाहिले
उंच्ध्वजा प्रगतीची अन् शांतीची
सुंदर माझ्या भारतमातेच्या
यशाची नि कीर्तीची!!४!!
कीर्तीचा डंका माझ्या देशाचा
अवघ्या जगात वाजू दे
शिक्षण, आरोग्य अन् तंत्रज्ञानाची
नित्य कास राहू दे!!५!!
