कोरोना! कोरोना! कोरोना!
कोरोना! कोरोना! कोरोना!
1 min
253
जगी प्रकटला विषाणू कोरोना
कोरोना कोरोना कोरोना
नाव काही घ्यायचे नाही
जाईना जाईना जाईना!!१!!
चीनमधील वुहान ग्रामी
अस्चच्छतेने हा प्रकटला
संसर्गाने फैलावला पसरविला
धुमाकूळ संपूर्ण धरतीवरी!!२!!
सगळी शासकीय यंत्रणा लागली
कंबर कसून कामाला
करण्या मुकाबला या सूक्ष्म जीवाचा
पण हार काही हा मानीना मानीना!!३!!
महान आमची संस्कृती हात जोडून स्वागताची
सर्व जगाला माहात्म्य आज कळले
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोणाचा हात हातात घेईना
असा हा विषाणू जगी प्रकटला कोरोना!!४!!
निसर्गाने आज मानवाला शिकविला धडा
नको बिघडवू तू सृष्टीची मालिका
नाहीतर होशील कारणीभूत तू
मानवाच्या विनाशाला जगी प्रकटला विषाणू कोरोना!!५!!
