गुढी संकल्पाची
गुढी संकल्पाची
1 min
302
गुढी उभारू आरोग्याची
गुढी उभारू संकल्पाची
करुया होळी अज्ञानाची
अंधश्रद्धेची अन् आळसाची
गुढी उभारू संकल्पाची!!१!!
बंद करु द्वेषाची द्वारे
सोडून देऊ आपसातील तंटे
आली वेळ हि एकजुटीची
ऐक्याची अन संयमाची
गुढी उभारू संकल्पाची!!२!!
महाराष्ट्रातील रक्षक सारे
झटती सर्व पराकाष्ठेने
लढण्या या कोरोनाशी
मी हि उचलीन खारिचा वाटा
करण्या प्रबोधन या जनांचे
गुढी उभारू संकल्पाची!!३!!
सर्व यंत्रणा सज्ज झाली
मुकाबला करण्या रोगाला
यांना बळ हत्तीचे मिळू दे
यास्तव माझे एकच मागणे
यश मिळू दे, देशावरचे संकट टळू दे
गुढी उभारू संकल्पाची!!४!!
