माझा कृष्ण
माझा कृष्ण
देवकी साजे माताl वसुदेव असे पिताl
म्हणे बाळ माझाl लडीवाळा कृष्णll१ll
राजस सुकुमार रुपl लाजरं, गोजिरंl
मम ओम पुत्र लाभl जसा बाळ कृष्णll२ll
बोबडे ते बोल कानीl सुमधुर ती वाणीl
पायी घुंगूर वाळा घालेl दुडूदुडू धावे अंगणीll३ll
मोह नसो संपत्ती धनl असो विवेकी आचरणl
मार्गी लावता तुजसीl वरद हस्ते कृपा दृष्टीll४ll
व्हावी उच्च प्रगतीl जिद्द ठेऊनीया जग ऐसीl
सत्कर्म नी सन्मार्गीl असो सदविचारी, अज्ञाधारीll५ll
सुसंस्कार घडो सदाl व्हावा परोपकारी, दानी।
घ्यावे तू ध्यानी, मनीl किर्ती पसरावी सर्वत्रीll५ll
होईजे जन्म दिन साजराl हाची आनंदी सोहळाl
सुसंगती लाभो तुझं प्रेमळl जीवनी फळ रसाळll६ll
दीर्घायुष्य लाभो तुजl हाची असे आशीर्वाद।
यशवंत हो, जयवंत हो। औक्षवंत हो बाळा।
जन्मदिनी व्हावाl शुभेच्छांचा वर्षावll७ll
