STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

माझा भारत

माझा भारत

1 min
279

सुजलाम सुफलाम माझा भारत

गुणगान त्याचे गाऊ चला...धृ


हिमालयाची उंच छाती

अभिमानाने तो डोलतो

ईट का जवाब पत्थर से देना

हेही तो सांगतो.....

प्रणाम त्याला करू चला.....!!


आम्ही वीर या देशाचे

आम्ही पायीक या देशाचे

भारत आमचा श्वास आहे

रक्षण करु आम्ही देशाचे

रक्षणार्थ तयाच्या जाऊ चला.....!!


पोलादी आमची छाती आहे

दगडांचे आमचे काळीज

कुणी नजर वाकडी करणाऱ्यास

उभा फाडतो तो काळीज

रक्षण देशाचे करू चला......!!


कृषिप्रधान देश माझा

आनंदाने राहू चला

मी भारत देशाचा

आणि भारत आहे देश माझा

डौलाने झेंडा तिरंगा फडकवू चला...!!



Rate this content
Log in