माई
माई
माई- ग -माई
काय तुझी घाई !
हातात बांगडया
डोक्यावर जुई !!
माई-ग-माई
काय तुझी घाई !
गळ्यात हार-अन
पर्स हातात बाई !!
माई-ग-माई
काय तुझी घाई !!
दूध पिण्यापूर्वी
शाळेत जाई !!
माई-ग-माई
काय तुझी घाई !
श्रीखंड-पेढा
लवकर आणा बाई !!
माई-ग.माई
काय तुझी घाई !
गावाला जाण्यास
नेहमी तयार राही !!
माई-ग-माई
काय तुझी घाई !
थापटल्याशिवाय
झोप नाही बाई !!