माहेरच्या अंगणी
माहेरच्या अंगणी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3
माहेरच्या अंगणी ...
माहेरच्या अंगणी ,
झुले आठवणीचे बांधुनी,
क्षण सुखाचे सोबती ,
वेळ गेली सांगुनी ...
रुणझुण वाजणारी ,
पायाला रुतल्या पैंजणी ,
उंबरठे इथेच थांबले,
केली माझी पाठवणी...
आठवणी माझ्या आठवे,
बकुळी गंधाळूनी ,
उरले ना काही तुझे इथे,
गुलमोहर पाहतो तरी वळूणी...
कुरवाळूनी धरल्या छातीशी ,
उरलेल्या आठवणी,
मनात भरूनी येता,
वाहल्या ओंजळ भरूनी...