माघ थंडी
माघ थंडी
1 min
209
राया माझी हौस हो पुरवा
बाई बाई झोंबतो गारवा...
उजेड पडला असा पुनवच्या चंद्राचा...
राया मांस हा आला माघ गुलाबी थंडीचा llधृll
काटा येई सरसर...
थंडीने राया केला कहर
सख्या याव भरभर
शेकोटी पेटवावी सत्वऱ
कारभारी याव जवळी दिसं पिरतीचा...
राया मांस हा आला माघ गुलाबी थंडीचा ll१ll
रात हि बहरदार
शाल आना राया उबदार
हुडहुडी भर अंगी
याव राया तुम्ही रंगामधी
नुसताच जीव काहो असा पुरवायचा
राया मांस हा आला माघ गुलाबी थंडीचा ll२ll
