STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

लेखणी

लेखणी

1 min
137

माझी लेखणी लेखणी

कशी  चालते  सुसाट

अन्यायाला वाचा फोडी

कधी लिहिते भन्नाट.....!!


विषमता दूर करण्या

माझी लेखणी चालते

अत्याचार होतो जेंव्हा

 मग विद्रोही बोलते.....!!


व्यथा शेतकऱ्याची मांडते

कधी प्रहार  करते

शस्त्र दुधारी तलवार

हाती मजबूत धरते......!!


शब्दा शब्दांत माधुर्य

कधी गोडवा सांगते

माझी लेखणी देखणी

तेंव्हा लाखात शोभते.....!!


माझी लेखणी देखणी

मोती सोनियाचे गुंफते

घेते काळजाचा ठाव

व्यथा गरीबाची मांडते....!!


माझी लेखणी देखणी

दुःख इतरांचे जाणते

दिला सावित्रीचा ठेवा

मनी आभार मानते........!!


माझी लेखणी देखणी

घेते काळजाचा ठाव

उसावल्या  वेदनांचा

नित्य शोधते ते गांव.....!!


माझी लेखणी देखणी

तुका, जनाई सांगते

भ्रष्टाचाराचीही लक्तरे

कधी वेशीला टांगते.......!!


माझी लेखणी देखणी

नित्य कर्तव्याला जागते

कशी दुरावली माया

आई देवाला मागते......!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन