लाजण्याचे सोहळे
लाजण्याचे सोहळे
1 min
14.3K
हा अबोला अन ही अढी भांबावलेले ऊर हे
या प्रीतीच्या पाखराला ग्रहण कसले ना कळे
गाव तुझा वेगळा जरी तू इथे अन मी इथे
एकरूपाचे आता किनारे होती वेगळे
मावळल्या हसण्याला कंदील शब्दाचे जरी
कोरडेपणाचे आताशा शर सलती आगळे
शांततेची ही भीती इथे तिथे जरी एक ग
ये जरासे एकवार इथेच होऊ मोकळे
वेदनांचे पाश आपण जाळू एकदाचे खरे
ये क्षणभर पाहू दे ते लाजण्याचे सोहळे

