STORYMIRROR

Vishakha Kulkarni

Others

3  

Vishakha Kulkarni

Others

ती

ती

1 min
181

तिच्या स्वप्नांचा रंग

तिच्या हातावरली मेंदी

तिच्या कर्तृवाची झेप

तिच्या भाळावरली बिंदी


ती भांडेल जगाशी

भाऊ असता पाठीशी

ती पाहील जगाला

सवे घेऊनी बापाला


तिची मर्यादा मनाची

असे घराचा उंबरा

घालमेल भावनांची

व्यापी मनाचा कोपरा


तिचे हिंडणे फिरणे

हा नसे स्वैराचार

तिच्यासाठी हो मुक्तिची

आता खुली झाली दारं


तिची बहिण सावित्री

तिनी यमा धाडीयले

तिची बहिण सत्यभामा

यमसदना धाडीयले


तिला नको हो सन्मान

शाल श्रीफळ सत्कार

जर द्यायचा असेल

थोडा द्यावा हो आदर



Rate this content
Log in