कविता माय मराठी
कविता माय मराठी
माझा लेखणीला धार ।
तुझामुळे माय मराठी ।
तुझेच शब्द, तुझेच वाक्य
आयुष्याला ह्या तुझा मुळेच आकार
माय मराठी ।
गीत तुझे ओठी माझा
तुझीच वाचावी गाथा ।
कणाकणात भरली तू,
ह्या आमच्या देहात ही आता ।
माय मराठी ।
कधी वाटे तू हिमालय
कधी वाटे तू धरणी ।
तुझेच अभंग,ओवी गावी
नतमस्तक व्हावे तुझा चरणी ।
तू अथांग ,अखंड प्रचंड,
तूझा शब्दांन पुढे छोटे हे वाटे हे ब्रम्हांड ।
काना,मात्रा,उकार,वेलांटी
ह्यांनी च घडवली आयुष्यात क्रांती
माय मराठी
तुला बोलताना तू आपली वाटते ,
तुला पाहताना तू आपली वाटते ,
तुला निहाळताना तू आपली वाटते,
तुला ऐकताना तू आपली वाटते ।
तूला भासताना ,
तुला सोसताना,
तुला लाजताना,
तुला वाचतांना,
तुला जगतांना,तू आपली वाटते
माय मराठी
जगामध्ये ही तुझं स्थान न्यार
तुझा प्रेमाचं वाहतया वार
तू दिलेल्या अ आ इ मुळे
आम्हाला कळतंया सार ।
आपले पणाचा भाव तुझात
साऱ्यांना सामावण्याचा आपले करण्याचा स्वभाव तुझात
माय मराठी आमची
तुझा दिलेल्या संस्काराचा कण कण आमच्यात ।
माय मराठी
