STORYMIRROR

Mahabali Misal

Others

3  

Mahabali Misal

Others

राणी

राणी

1 min
255


ही अचानक येणारी वादळे,

बेभान होऊन वाहणारे सागरे,

पडणाऱ्या हा अचानक पाऊण

तू नाराज झाली आहेस,त्यामुळेच होतंय ना।


ढगांचे रागात गडगडने,

वाऱ्याचे बेभान होऊन बिथरने,

ह्या श्रुष्टीचे अचानक वातावरण ढासाळणे

तू नाराज झाली आहेस,त्यामुळेच होतंय ना


🌔🌎🌔🌎🌔🌈🌔🌎🌔🌎🌔


येणारे रोग,होणारे कोप

जाणारे जीव, त्यांचा अंत्यसमयी कमी व्हीव

*तुझ्यामुळेच ना*


माणूस माणसापासून दूर 

लांबूनच एकमेकांची करतो विचारपूस

*तुझामुळेच ना*


गर्दी नाही,गोंगाट नाही

माणसाच्या झुंडीची लाट नाही

*तुझ्यामुळेच ना*


मास्क ,सॅनिटायझर वापरणे 

आपली माणसे व आपली सुरक्षा जपणे 

*तुझ्यामुळेच ना*


*प्रिय निसर्ग राणी*

तू नाराज झाली आहेस,त्यामुळेच होतंय ना


🌔🌎🌔🌎🌔🌈🌔🌎🌔🌎🌔


पण आम्ही आता सुधारलोय 

पर्यावरण रक्षणार्थ एकवटलोय

येणाऱ्या धोक्याला समजलोय 

सृष्टी च समतोल रहावे म्हणून आता झटलोय

आम्ही पर्यावरण वाचू,प्रदूषण टाळू 

स्वच्छता राखू,येणारे धोके टाळू

तू नाराज होणार नाही ,ह्याची काळजी घेऊ,

वृक्षारोपण करून पृथ्वी सजवू


प्रिये ,तू नाराज नाही ना 

*प्रिय निसर्ग राणी*

तू नाराज नाही ना

🌔🌎🌔🌎🌔🌈🌔🌎🌔🌎🌔


Rate this content
Log in