Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Komal Kamble

Inspirational

4  

Komal Kamble

Inspirational

कर्तृत्व

कर्तृत्व

1 min
1.2K


उठ आता भिऊ नको

तुझे भावनारूपी शब्द

मनी तुझ्या ते दाबू नको||धृ||


आयुष्याच्या प्रत्येक वळणी

मनधरणी तू करू नको|

माझे जगणे माझे नाही

असे कधीही म्हणू नको||


दुःखाचे ते नयनी आसव

सुख म्हणूनी लपवू नको|

होता अन्याय कधी कुणावर

तू कुठेही खपवू नको||


कधी कुणाच्या भावनांशी

तू करू खेळ नको|

रोखू नको सुख-दुःखांचा

तू कधीही मेळ नको||


अपुल्या मनमंदिरी

त्या आईचा रोष नको|

लोभाच्या त्या हव्यासापोटी

खोट्याचा तो वेष नको||


मातीचे ते ऋण फेड

समजू त्यास भार नको|

कुणा दाखविण्या बडेजावासाठी

सोळा-शृंगार हा नार नको||


अपुल्या मनी ठेवू साठवून

द्वेषाचा डोह नको|

मदतीच्या त्या हाकेसाठी

ठेवू कुठला मोह नको||


कधी होऊ आयुष्यात

निराशेवर स्वार नको|

आयुष्यातील यशासाठी

कधीही मानू हार नको||


असत्याची पाठ राखून

सत्याला तू मुकू नको|

अन्याय अत्याचारासमोर

तू कधीही झुकू नको||


मातीसह मातेचे ऋण

फेडायाला चुकू नको|

अधर्माची जाण होऊनी

सत्कर्माला मुकू नको||


तुझ्या विक्रमी बाहूंवरी

या देशाचे देणे आहे|

हे जाणवता तुझ्या मनाला

कृतघ्नपणा करू नको||   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational