कल्पना
कल्पना

1 min

134
सूचते आहे खूप काही
पण लिहिता येत नाही
शब्दरूपी भावनांना
मांडता येत नाही
लिहिण्याचा बेत केेेेला
तर काहीच आठवत नाही
लिहिता लिहिता विचार केला
तर शब्द जूळणी होत नाही
सूचता सूचता सूचेल काही
असे मजला वाटत असे
शब्दांच्या त्या निखळ जलाचे
मनी वाहत जणू पाट जसे
मनी जणू कधी विचार येतो
हे शब्दगाणे असेच का
हे गीत लिहिण्याचा बेत करता
लिहिताना ते आठवेच ना
सूचता सूचता सूचत नव्हते
घेता हाती लेखणी
कशी होतेे निर्मिती कवितांची
लेखकाच्या त्या मनी
सूचण्याला ही सूचना आहे
तू कधीही सुचू नको
सूचता सूचता लिहिण्या बसता
कधी मनी तू विरू नको