Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Komal Kamble

Inspirational

4  

Komal Kamble

Inspirational

अभिनंदन

अभिनंदन

1 min
713

करी तुजला संपूर्ण देश

मनोधैर्याने वंदन नंदन|

ऐक या मायभूमीचे स्पंदन

जणू बहरती चोहोबाजू चंदन||

प्रणाम तुझ्या सामर्थ्याला

प्रणाम तुझ्या पराक्रमाला|

मायभूमीचा गौरव केला

मात देऊनी शत्रू राष्ट्राला||

वायूसारखा हरवून आला

वायूसारखा निघून आला|

तुझ्या या पराक्रमाने

शत्रू राष्ट्रावर घातला घाला||

तुझ्या कर्तृत्वाने शत्रूची

ती बोबडी वळली|

या देशाच्या सैन्यदलाची

शत्रू राष्ट्राला ताकद कळली||

देशाच्या गौरवासाठी सांडले

तू सळसळणारे रक्त|

रक्तामधील जोश बघूनी

भयभीत झाले शत्रूचे भक्त||

आतंकवादास रोखण्या

उभारलीस ती काठी|

वेळोवेळी झुकेल हा तिरंगा

तुझ्या सन्मानासाठी||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational