Vijay bamugade

Others


4.0  

Vijay bamugade

Others


क्रीडाशिक्षक

क्रीडाशिक्षक

1 min 192 1 min 192

"क्रीडाशिक्षक" म्हणजे सूर्याचा प्रकाश

जो अंधारात विद्यार्थ्यांना मार्ग दाखवतो

"क्रीडाशिक्षक" म्हणजे चमकता तारा

जो स्वतःबरोबर विद्यार्थ्यांना चमकवतो


"क्रीडाशिक्षक" म्हणजे वटवृक्षाची सावली

जो रात्र दिवस पाठीशी खंबीरपणे उभा राहतो

"क्रीडाशिक्षक" म्हणजे शिल्पकार

जो आपल्या कलेने शाळेतील फुले फुलवितो


"क्रीडाशिक्षक" म्हणजे प्रेमाची खाण

जो प्रेमाने समजुतीचे दोन शब्द सांगतो

"क्रीडाशिक्षक" म्हणजे मूर्तिकार

जो मैदानावर एका पेक्षा एक मूर्ती घडवितो


"क्रीडाशिक्षक" म्हणजे कोहिनुर हिरा

शिस्तप्रिय म्हणून असतो दरारा

"क्रीडाशिक्षक" म्हणजे विजय

जय-पराजयचे नसते त्याला भय


"क्रीडाशिक्षक" म्हणजे आरोग्याचा पुजारी

जो शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम बनवितो

"क्रीडाशिक्षक" म्हणजे विद्यार्थ्यांचा आवडता हिरो

जो त्यांच्या आवडी निवडी बघून शिल्प घडवितो


Rate this content
Log in