कोरोना
कोरोना
1 min
31
कोरोना नावाची आलीये महामारी
जो घरी राहील तोच तरणार भूवरी
होम क्वारंटाईन होण्याचा सरकारनं दिलाय सल्ला
घरा बाहेर पडू नका नाहीतर कोरोना करेल हल्ला
या महामारीचा धसका साऱ्या जगाने घेतला
दिवसेंदिवस वाढून आकडा सारा जग पेटला
सरकारने घेतला आहे जनतेच्या सुरक्षतेचा ध्यास
लॉकडाऊन मध्ये घरी राहून मदतीचा करा प्रयास
आहे जरी संकट मोठे आम्ही नाही घाबरणार
ध्येयाने सामोरे जाऊन स्वतःसह देशाला सावरणार
पोलीस, डॉक्टर, शेतकरी यांना माझा सलाम
महानगरपालिकेतील कामगारवर्ग, नर्स यांना माझा प्रणाम
