STORYMIRROR

Vijay bamugade

Others

3  

Vijay bamugade

Others

जगामध्ये कोणी नाही परमंनट

जगामध्ये कोणी नाही परमंनट

1 min
349

जगामध्ये कोणी नाही परमंनट

विसरलास का रे मानवा जन्माला आल्यावर या देवाचे एग्रीमेन्ट.....

सर्वाना वाटत हे माझ ते माझ

मोहमाया मनामधून गेल्यावर , कळेल तुला काहीही नव्हत तुझ ...

बंगला , मोटार खरेदी करून , तू करतो पक्की अरेजमेंट

विसरलास का रे मानवा जन्माला आल्यावर या देवाचे एग्रीमेन्ट.....

जसे करशील , तसे पाहशील , पाप पुण्याचे फळ तू भोगशील ,

यमाचे दूत तुला पकडून घेऊन जातील

त्यावेळीस ते घेतील तुझे स्टेटमन्ट

विसरलास का रे मानवा जन्माला आल्यावर या देवाचे एग्रीमेन्ट.....

फसवून लोकाना वाईट कर्म तू करशील

जीवनात तुझ्या तू काळे डाग पाडशील

मग धर्मराज तुझी हिस्ट्री वाचतील , त्या वेळीस चुकेल तुझे जजमेन्ट

विसरलास का रे मानवा जन्माला आल्यावर या देवाचे एग्रीमेन्ट.....

कर्माचे फळ प्रत्येकाला भेटतील

जसे पेरशील , तसे मिळवशील

जसे कर्म करशील मानवा त्याचे मिळेल तुला पेमेन्ट

विसरलास का रे मानवा जन्माला आल्यावर या देवाचे एग्रीमेन्ट.....

हरिनामाचे सुमिरन करून , जीवन तुझे शुद्ध करून घे

मग बघ मानवा , जन्म - मरणाच्या फेरयातुन सूटन्याचे मिळेल तुला प्रेजेन्ट ......

म्हणून म्हणतो मानवा

विसरु नको या देवाचे एग्रीमेन्ट.....

Rate this content
Log in