किमया विज्ञानाची...
किमया विज्ञानाची...
चल गड्या आज करु सफर विज्ञानाची
लिंबू मिरची जाळून कास धरु विज्ञानाची IIधृII
एडीसनच्या बल्बने दाखविला प्रकाश
अंतराळ यानानं जवळ आलय आकाश
परंपरा रुढी जपत प्रगती आहे साधायची
देव धर्म संभाळुन भक्ती कर विज्ञानाची II१II
ग्रॅहम बेलच्या फोनने घडवला इतिहास
बबेजचा कंप्युटर सगळ्यांसाठी खास
न्युटनच्या गतीनं वाढेल गती विकासाची
विश्वाच्या निर्मितीला साथ आहे विज्ञानाची II२II
राईटच विमान घेतयं उंच उंच भरारी
इलेक्ट्रॉन प्रोटॉन संगे न्युट्रॉनची सवारी
कमाल पाहु डार्विनच्या सरल जीवसृष्टीची
अणु रेणु एक्स रे अनमोल देण विज्ञानाची II३II
टेलिस्कोपच्या मदतीने ब्रम्हांड फिरु
मारकोनीच्या रेडीओने मनी उमंग भरु
इथे रोज नांदी नव्या नव्या प्रयोगाची
शिकून घेऊ या सारे किमया विज्ञानाची II४II
चल गड्या आज करु सफर विज्ञानाची
लिंबू मिरची जाळुन कास धरु विज्ञानाची IIधृII
