खरंच हे स्वातंत्र्य
खरंच हे स्वातंत्र्य
स्वातंत्र्याची गाथा गातांना ...........
आसवे डोळ्यात येतात...............
मिळूनही स्वातंत्र्य आपणास........
आजही ज्वलंत प्रश्न भेडसावतात...!!१!!
मनाचे शब्द आजही येथे.............
समाजात मला येथे मिळतात........
नव्याने जग दाखवूनही येथे.......
आज ही मातेचे धिंडवडे काढतात....!!२!!
स्वातंत्र्य बोलूनही स्वतःला........
का जातीचे राजकारण करतात.
बलात्कार घटना आजही बर.....
का या धर्तीवर बर होतात.............!!३!!
करुनी स्वातंत्र्याचा दिन साजरा
आज मनांत तेच प्रश्न येतात........
कधी बदलणारं आपण स्वतःला
देश कधी हा सुंदर आपला होणार...!!४!!
💞❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
मानवता आज हरवली आहे......
मान सन्मान कुठे राहीला आहे
जो तो आपल्या धुंदीत येथे.......
मानवता आज खरंच हरवली आहे.......
पैसा हा मानवतेचा येथे
दुश्मन होत चालला आहे...........
ज्यांच्या कडे झाला जास्त पैसा......
तोच मानवतेला विकत आ आहे.........
कुठं ना राहीला मान सन्मान
जो तो आपल्याच ऐटीत बोलत आहे
आला जरी राग कुणावर येथे....
त्याचा जिव एका क्षणात जात आहे......
गर्व अहम आज प्रेमात ही......
खुप अपेक्षा प्रेमात दिसत आहे......
मानवतेला प्रेमाने बघितले का कोणी.....
जो तो आपलेच बघत आज आहे....
ज्यांच्याकडे आहे पैसा ना
प्रेम पण तिकडेच पळत आहे.......
मानवतेच्या गोष्टी करुनी येथे
मानवतेचा गळा कापत आहे..........!
प्रेम ही आज मानवतेच्या........
नावाखाली लपली जात आहे........
जो तो प्रेमाचे चाळे करुनी............
प्रेमात खोटे बोलणे सुरु आहे.........
