STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

खेळते भवरा

खेळते भवरा

1 min
212

लगबग...लगबग...खेळू बाई....!!!

बघतो मला चोरून नवरा.....

अन् ...गरगरा...गरगरा...गरगरा...गरगरा... 

फिरतोया भवरा...मी खेळते भवरा.....llधृll


खेळात हे मन झाले वेडं....

थांबता हि थांबेना हे थोडं..

हळूच...दोर...ओढी..बाई....!!

नटखट सखा सावरा......

अन्..गरगरा...गरगरा...गरगरा...गरगरा...

फिरतोया भवरा...मी खेळते भवरा.....ll१ll


भवरा हातावर गोल फिरं....

सप्तरंगी रंगात दिसं......

धुंदित...त्याच्या...रंगला.. गं बाई.....!!

नटरंग माझा सावरा.....

अन्.. गरगरा... गरगरा... गरगरा... गरगरा...

फिरतोया भवरा...मी खेळते भवरा ....ll२ll


लगबग.. त्याला दोर बांधतं...‌

अलगद भवरा भुईवर सोडतं....

हळूच...गाली...हसतो...बाई.....!!

टकमक बघतो.. नवरा.....

अन्...गरगरा...गरगरा... गरगरा...गरगरा...

फिरतोया भवरा...मी खेळते भवरा...ll३ll


खेळामंदी गंमत वाढं.....

भवरा फिरता धुंद चढं....

खाना... खुणा...करी....बाई....!!.

खोडकर सखा सावरा.....

अन्...गरगरा...गरगरा...गरगरा...गरगरा...

फिरतोया भवरा...मी खेळते भवरा....ll४ll



Rate this content
Log in