Rama Khatavkar

Others


3  

Rama Khatavkar

Others


खेळिया

खेळिया

1 min 11.6K 1 min 11.6K

खेळगडी आला| जीव हा लावला|

खेळ हा मांडला| संसाराचा||१||


आधी पडे कोडे| मग उलगडे|

गाडा गडगडे| पुढे पुढे||२||


मिळे कधी फळ| कधी हारे बळ|

आहे सारा खेळ| संचिताचा||३||


जीव आणि काया| ब्रह्म आणि माया||

कोण हा खेळिया| खेळवितो||४||


Rate this content
Log in