खेळ शब्दांचे..
खेळ शब्दांचे..
1 min
534
मनात माझ्या असतात चालू
नेहमीच हे खेळ शब्दांचे..
माझ्या मनाच्या किनाऱ्यावरून
उसळती या शब्दांच्या लाटा..
मनातील हुंदग्यांना शोधत येति
हळूच या शब्दांच्या वाटा..
कवी मन या पवनचं जाणे
कसे भेटतात हे शब्द त्याला
शब्दांच्या खेळाचा पवन मदारी
रचतो खेळ शब्दांचे जणू
प्रत्येकाच्या मनाच्या दारी..
शब्द असतात मनाचे माझ्या
आवडतं मलाही मानतील माझ्या
खेळ शब्दांचे हे खेळायला..
शब्दांचे खेळ पाहुनी या मनाला
माझाच वाटतो कधीतरी मलाही हेवा...
