STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

कडुनिंब (आयुर्वेदिक कविता)

कडुनिंब (आयुर्वेदिक कविता)

1 min
237

कडुनिंब आहे औषधी फार

नष्ट होतील सारे विकार

नियमित याच्या सेवनाने

पळून जातील सारे आजार...!!


शुद्ध ऑक्सिजन पुरवतो

टाकतो पोटातले कृमी मारून

डायबीपीज, बीपी दूर करी

टायफाईड राहतो दुरून....!!


आजीबाईचा औषधी बटवा

खेड्यात जास्त प्रभाव

शीतल छाया देत राहतो

शहरात मात्र बराच अभाव...!!


खाज, खुजली दूर करी

कडुनिंबाचे औषध ठेवा घरी

नियमित खावी पाने चार

आरोग्याची चिंता दूर करी....!!


कॅन्सरला दूर पळवी

फेसपॅक बनतो लय भारी

मुरूम, फोड, सुरकुत्या जाती

असे कडुनिंब गुणकारी.....!!


पिते आहे एक कप काढा

तुम्हीही पीत चला कधी

नाही पडणार आजारी 

मिटेल शरीराची सर्व व्याधी...!!


Rate this content
Log in