का गेलीस आई सोडून तू मला
का गेलीस आई सोडून तू मला


का गेलीस आई सोडून तू मला
रडता रडता डोळे झाले ओले
कोण पूसेल माझे अश्रूचे थेंब सारे
तुझी प्रतिमा दिसलीस जेव्हा
प्रेमात पडलो मी तुझ्या
गायीच्या वासराला बघून
ध्यान येते गं तुझे मला
न कोणीच शिकवलं मला
न कोणीच लावलं वळण
पाटीच्या लेखणीकडे बघून
आठवते आई तू मला
तहानेने व्याकुळ झाला जीव
जग सारे सुने वाटे मला
भाकरीच्या ताटाकडे बघितल्यावर
आठवते आई तू मला
एखाद्याला एखाद्याची
आई हाक मारते
त्याच क्षणी मी थबकतो
आणि आठवते आई तू मला
मला सोडून जाण्याच्या आगोदर
थोडा पण विचार केला नाही
तुला जगायचंच नव्हतं तर
मला जन्म घेण्याच्या आगोदर
घोटून का टाकले नाही