नवीन
नवीन


सूर्याच्या नवकिरनाने
नवीन पहाट फुलवा
तुमचे समृद्ध विचार
इतरांच्या मनात रुजवा
समृद्ध आहेत आपले विचार
आणखी समृद्ध बनवा
स्वत: उंच जाता जाता
मातीवरच्या खुशीत घेऊन थांबा
नवकिरन आहात तुम्ही या देशाचे
या देशाला फुलवा
फुले शाहू आंबेडकर
यांच्या विचाराने नवीन पाऊल उचला
विश्वास शोभती आपली संस्कृती
त्या संस्कृतीला जपा
शूर वीरांचे पुस्तक वाचून
तुम्ही घडा व इतरांना घडवा