STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

जय जय गुरुदेव

जय जय गुरुदेव

1 min
479

भवसागरी या, मुक्तीचा किनारा तुम्ही

अंधाऱ्या मार्गी या, दॄष्टीचा प्रकाश तुम्ही

खडतर आयुष्या, आशेचा किरण तुम्ही

अज्ञानी साधका या, ज्ञानाचा दीप तुम्ही


जय गुरुदेव जय जय गुरुदेव

श्री गुरुदेव जय जय गुरुदेव


मातीचा गोळा आम्ही, घडविता ब्रह्मा तुम्ही

अडखळते बालक आम्ही, चालविता विष्णु तुम्ही

भरकटते भोगी आम्ही, करारी शीव तुम्ही

पामरसे भक्त आम्ही, साक्षात परब्रह्म तुम्ही


जय गुरुदेव जय जय गुरुदेव

श्री गुरुदेव जय जय गुरुदेव


शरणागत लीन चरणी, अभयदान पडो पदरी

जन्मोजन्मीचा पापी, गंगास्नान घडो आजी

अतृप्त पीडित चक्री, कृपामृते मिळो तृप्ती

चटके अज्ञान धगी, ज्ञानचंद्रे लाभो शांती


जय गुरुदेव जय जय गुरुदेव

श्री गुरुदेव जय जय गुरुदेव


आळवितो तव सदगुरु राया

प्रगतीचा मज प्रसाद द्यावा

परिसस्पर्शे योग जुळवा

सुवर्णमय जन्म घडवा


जय गुरुदेव जय जय गुरुदेव

श्री गुरुदेव जय जय गुरुदेव


Rate this content
Log in