STORYMIRROR

Amol Shinde

Others

3  

Amol Shinde

Others

जरा मी

जरा मी

1 min
364

तू पाहिलं प्रेम समजलो चुकलोच जरा मी

खोटे सोबतीला असता थबकलोच जरा मी


गाव सारं गोळा झालं दुष्मनी माझी पहायला 

नरडीचा घोट घेतला अन संपलोच जरा मी


घोट नरडीचा घेणारे रक्तातले माझे ते होते

अडवले कोणी हे पाहून का रडलोच जरा मी


खाणारे एक गाणारे एक माझ्या सोबतीला

भरवून देणाऱ्याच ऐकलं भांडलोच जरा मी


झाले एकत्र जे माझ्या सोबतीला होते कधी

मतलब भागलं त्यांचं अन गाजलोच जरा मी


वाट माझी होती सरळ साधी जगतांना जरी

आपले दुःख घेऊन सोबती नडलोच जरा मी


मेलो जरी कधी हसणार हे आधी पाहून मला

यांच्यासाठी जगतांना कसा पडलोच जरा मी


श्वासातला देव ही समजलो रोज मी ज्याला 

श्वास रोखून गळा दाबला अन मेलोच जरा मी


शोधू शेवटी खांदा देणारे मयतीला माझ्या

जिवंत माझे मढे पाण्यात सोडतोच जरा मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन