STORYMIRROR

Pritam salunkhe

Others

3  

Pritam salunkhe

Others

जीवन - एक प्रवास

जीवन - एक प्रवास

1 min
39

निसटत चाललेले सुख,

अवघड वाटणारी वाट,

जी होती कधी सुवर्णमेढ,

 कधी गर्द रात्र, कधी रम्य पहाट


हुरहुर दाटते मनात,

कसे जावे सोडून एका क्षणात??

आपण आपलेच नसतो तेंव्हा,

राहतो त्या आठवणींच्या जगात... 


खुशाली कळवं असे म्हणून, 

खिडकीतून आईला रडताना पाहत, 

खाली हात घट्ट दाबून धरलेला, 

पन मनात ढसाढसा आत रडत... 


सुट्टी कमीच घेतली नाही ह्यावेळी?? 

मनातल्या मनात स्वतःला कोसून, 

गाव सोडताना नमस्कार करतो, 

गावदेवाला पुन्हा पुन्हा वाकून.. 


गावाची शीव सुद्धा, जाताना ओसाड वाटते, 

जखमी झालेल्या घराची, ती आता कवाड वाटतेे. 

आज पुन्हा रडून ओला होणारा रुमाल, 

सुकवून नाही टाकत, जी माया मनात दाटते... 


एकीकडे कुणी निरोप देतो, 

दुसरीकडे कुणी स्वागत करतो, 

जीवन तर एक प्रवास राजा, 

त्याचा होतो जो चालत राहतो, 

जीवन तर एक प्रवास राजा, 

त्याचा होतो जो चालत राहतो... 


Rate this content
Log in