जात नसती तर किती बरं झालं असतं
जात नसती तर किती बरं झालं असतं
सकाळी सकाळी माझ्या मनात विचार आला कि
हि जात पात नसती तर किती बर झाल असत.....
ना भेदभाव ना उच्च नीच सर्व काही समान , फक्त माणुसकी
माझ्या मनात विचार आला फक्त माणुसकी...
आज आपण उच्च शिक्षित झालो पण जन्मताच कागदावर येऊन बसली
ती जात कितीही काढण्याचा प्रयत्न केला पण ती काही गेली नाही अन
सकाळी सकाळी माझ्या मनात विचार आला जात नसती तर किती बर झाल असत ,......
जातीच्या नावाखाली आम्ही वाटल्या गेलो आम्ही बाटल्या गेलो
आणि जातीच राजकारण करणाऱ्याच्या ताटाखालचे आम्ही मांजर
झालो आम्ही गुलाम झालो, म्हणून माझ्या मनात विचार आला कि
जात नसती तर किती बर झाल असत .......
माझी सरकारला विनंती आहे कि माझ्या शिक्षणातल्या कागदावरची
जात पहिली काडा आणि तिथे मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हिच जात द्या ...
तरच होईल समाजाची प्रगती आणि वाढेल मानवतेची गती…………..
हेच विनोदाच स्वप्न आहे जे होईल एक दिवस खर आणि निघून जाईल जात
आणि राहील फक्त मानवता आणि माणुसकी .....
सकाळी सकाळी माझ्या मनात विचार आला कि जात नसती तर किती
बर झाल असत.....
