अबोल नातं
अबोल नातं
अबोल नातं मी सर्वात पाहिलं जवळ तर सर्व माझ्या पण बोललं नाही कोणी हे मी पाहिलं .1
नव्या युगाची नवी नाती जुळतात फक्त फोन वरती जवळचे तर सर्वच वाटतात फक्त चाटिंग वरती... 2
हीच का नवी पिढी उच्च शिक्षित झालेली0अन सोशल मिडीयाच्या आहारी जाऊन माणूसपण हरवलेली..... 3
सुखाचा क्षण असो वा दुखाचा डोंगर, फक्त एक स्टेटस ठेऊन भावना व्यक्त करणार व माणूस समोर आला कि गप्प बसून राहणार अन मोबाईलात डोक घालणारं हेच का ते अबोल नात.....4
हे सर्व पाहून वाटत पूर्वीचाच काळ बरा होता रोज आईच्या आवाजाने जाग यायची अन दिवस आनंदात जायचा रात्री सर्व जेवायला एकत्र बसायचे अन सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायची..... 5
समजेल का नव्या पिढीला कि भावना व्यक्त करायला माणसांचा सहवास महत्वाचा असतो सोशल मिडीयावरती तर संशयच जास्त असतो ......6
सद्बुद्धी येवो या नव्या पिढीला विनोदा, अन समजो नात्यातील गोडवा येऊ दे आईच्या कुशीत एगदा अन पाहू दे स्वप्ने जग जिंकण्याची अन बोलक करो अबोल नात्याला बोलक करो अबोल नात्याला ......7
