जाहिरात फलक
जाहिरात फलक
मान उंच न करता
लांबूनच दिसता जाहिरात फलक
अगदी मोक्याच्याच जागी
वळणा वळणावर...
अवाढव्य ते लोखंडी ढाचे
त्यावर ती लोखंडी कमान
चोपून चापून लावले जातात
जाहिरातींचे फ्लेक्स...
अंधारातपण दिसावे सर्वांना
म्हणून त्यावर
स्टाईलिश लाईटिंगची झगमग
दिपवतात डोळे पाहणार्यांचे...
तर कधी असते खोल दरी
अचूकतेने टिपलेली ती मोक्याची जागा...
गच्चीवर जाण्यास मज्जाव
पण
दोन पैसे जास्तीचे मिळावे
म्हणून सोसायटी देते परवानगी
गच्चीवरती जाहिरात फलक लावण्यास...
जाहिराती त्यावर श्रीमंतांच्या
कोटीच्या कोटी किंमतीच्या वस्तूंच्या
अघटीत घडले काही तर
दुःख का कसे कोणाला...
गेले पंधरा सोळा
देऊ पाच पाच लाख त्यांना
पण
बांधलेल्या त्या ढाच्यावर
लाऊ परत कोटीच्या जाहिरातीच
कोटींच्याच जाहिराती...