हा उनाड वारा
हा उनाड वारा
हा उनाड लबाड वारा
पाहुन जवळ आला
घेवून कवेत तिला
हा गार गार झाला
या मंद धुंद लहरी
हसरी हसरी लाजरी
स्पर्श करुन हिला
देहात सरसर शिरली
ते पहा ढग गरजले
अंग अंग भिजले
शृंगार तिचा निखळला
घेवून मिठीत तिला
पायात घुगंरू घुंगरू छमछमले
पाने फुले नाचले
मंजूळ मैना गायली
पाकळी विरळ झाली
डोंगर दऱ्यांची वाट
त्याला गोल गोल घाट
फुलली वनराई घनदाट
तिला नागमोडी वाट
सह्याद्रीच्या शिखराला
मुकूट हिरवा शोभला
तिलक चंद्राचा कसा
त्याच्या माथ्यावर सजला
शीळ पावसाने घातली
खळी गालावर पडली
ओंजळीत लपवून चेहरा
वसुंधराही लाजली