STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

गवळण

गवळण

1 min
318

किती साजरे......किती गोजिरे

रुप तुझे रे हरी......

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या....दर्शन दे कधीतरी llधृll


यमुना तिरी..... कान्हा उभा...राही

गुरे राखण्या...... घेऊनी..येई

किती लाजरे.....किती हासरे

रुप तुझे रे हरी......

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या....दर्शन दे कधीतरी ll१ll


बासरी वाजवी.....कान्हा.. बाई

गवळणींचे ...मन ...मोहून घेई

किती साजस.....किती गोंडस

रुप तुझे रे हरी........

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या.....दर्शन दे कधीतरी ll२ll


यमुना तटी गोपी....स्नाना जाती

वस्त्रे त्यांची .....पळवुन लपवीशी

किती कावरे.....,.....किती बावरे

रुप तुझे रे श्रीहरी..........

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या.....दर्शन दे कधीतरी ll३ll


खोडी काढून ‌......फजिती पाहशी

गोपी कान्हास.......किती विनवशी

किती खोडीचं.......किती गोडीचं

रुप तुझे रे हरी..........

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या......दर्शन दे कधीतरी ll४ll


Rate this content
Log in