गुढीपाडवा
गुढीपाडवा
1 min
624
गुढीपाडवा;उगवला आज,
दिन हा नवा चैतन्याचा.
गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा,
दिन हा शुद्ध पतिप्रदेचा.
पुजन करू कलशाचं,
प्रतिक तो यशाचं.
ठेवुनी तयावर साखर,
वाढवू तत्व माधुर्याचं.
साडी जरीची गुढीची,
वैभवाची देई वृध्धी,
नारळ ते पुजनाचे,
प्रार्थनेला देई सिद्दी.
पुष्पहार देई मंगलता.
आरोग्य लाभो सर्वांना,
पुजनाने कडुनिंबांना;
करु नष्ट व्हाईरसांना.
वेळु प्रतिक सामर्थ्याचं.
हळद कुंकू सौभाग्य.
लावुन गुढीस भक्तीनं,
जपु हे महाभाग्य.
भारतीय संस्कृतीला,
जपुन आनंद हर्षाने.
संकटाला हरवून,
गुढी ऊभारू विजयाने
गुढी उभारू जयाची
