STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

गझल

गझल

1 min
216

माणसाला वाढली रे हाव आहे

बघ महागाई तुझा प्रभाव आहे....!!


माणसाने माणसावर घातलेला

तो विणाकारण कुटीलच डाव आहे...!!


रोज आश्रमात राही बाप ज्याचा

उरला तो कायच बडेजाव आहे....!!


तूच कर रे न्याय आता बा विठ्ठला

कोरडा तो माणुसकी भाव आहे.....!!


वरवरी घेती तुझे रे नांव देवा

त्या भक्तीचा कोरडा अभाव आहे....!!


आज क्षणभंगूर जीवन माणसांचे

कुंपणाला माणसाची धाव आहे......!!


भाकरी खावी कष्टाची रोज आता

गरिबांच्या अंतरी तो घाव आहे......!!


मारतो आता बढाया जो पुढारी

माणसांचा भोवती घेराव आहे....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन