गझल
गझल
1 min
483
पिवळ्या बाभळ फुलासारखी उमलत गेले मी
काट्यांची ही वाट निरंतर सजवत गेले मी
आशेचीही किरणे आली नवीन स्वप्नी ती
माळावरच्या खडकात बीज रुजवत गेले मी
सोसाट्याचा वारा येता अंतरी दीप हा
आयुष्याच्या वादळातही फुलवत गेले मी
पोटासाठी राबत गेले बाप होऊन मी
सुखदुःखाची कशी बेरीज मिळवत गेले मी
काळोखाचा तिमिर दाटला बघ सभोवती हा
शोधत संधी अता स्वतःला घडवत गेले मी
