STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

एप्रिल फुल

एप्रिल फुल

1 min
169

कोण किती हुलकावणी देईल 

याचा काही नेम सांगता येत नाही 

माणसाच्या डोळ्यात कशी पडली भूल 

हेच तर आहे खरे एप्रिल फुल 


कधी दुष्काळ कधी रोगराई 

विनाश ओढवुन घेण्याची झाली घाई 

माणसाची हवा निसर्गाने केली गुल 

हेच तर आहे खरे एप्रिल फुल 


शेतात पिक जोमाने झाले हिरवेगार 

वर्षाचा हिशोब यंदा उडवू बार 

हातात आलेला पिकाने दिली हूल 

हेच तर आहे खरे एप्रिल फुल 


अणुशक्ती, अणुबाॅंबचा मांडला बाजार 

एका न दिसणाऱ्या जीवाने केले बेजार 

एका ठिणगीने कशी केली एक चूल 

हेच तर आहे खरे एप्रिल फुल 


वृक्ष तोड घराची किती केली कत्तल 

धर्माच्या नावाचे बळी जाती निष्पाप 

रंगाची वाटणी इंद्रधनुष्याचे ऐटीत डुल 

हेच तर आहे खरे एप्रिल फुल 


साहित्याला गुण द्या
लॉग इन