एकाकी जगणे
एकाकी जगणे


प्रत्येकाचे बाबा आपल्या
मुलावर खुप प्रेम करतात
काया झिजवून आयुष्यभर
पै पै जोडतात
राब राब राबुन बाबा कधीच थकत नाही
लेकराच्या डोळ्यात
अश्रू येवू देत नाही
जगणे बापाचे मुलांसाठीच असते
याची जाणिव मात्र
कुणालाच नसते
बाप सोडून जेव्हा पोरगा
दुर देशी जातो
मुलाशिवाय बाप
एकाकी जगतो
घरहोते सुने सुने
बोल मुके होतात
रिकाम्या घरात दिवस
कसेबसे जातात
मुलगा सुखी झाल्यावर
म्हातारपण सुखात जाईल
असे बाबांना वाटते
पण....
लाडाच लेकरू वाटपाहूनही येत नाही
जीव एकाकी जातो
शेवटचं डोळे भरून
पाहता येत नाही
खांदे उसणे शेजारपाजार चार
डाग अग्नीचा परका देतो
भेटीवाचुन लेकराच्या
बाप तरसुन मरतो.