STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

दर्शन दे मुरारी

दर्शन दे मुरारी

1 min
207

कान्हा..,... फसवू नकोस रे श्रीहरी

मला ही......... रूप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा... राधे ‌कृष्णा...राधे कृष्णा

राधे कृष्णा....राधे कृष्णा... राधे कृष्णा llधृll


दिसशी तू बाळा 

शाम रे सावळा

असशी ठाव तुझा या मन मंदिरी

मलाही....रुप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा... राधे कृष्णा.... राधे कृष्णा

राधे कृष्णा... राधे कृष्णा.... राधे कृष्णा ll१ll


कारे खोड्या करीशी ,,

गोपिकांना छळशी

शाम सख्या नटखट मोर मुकूट धारी

मलाही....रुप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा.....राधे कृष्णा.. राधे कृष्णा

राधे कृष्णा.... राधे कृष्णा.. राधे कृष्णा ll२ll


बासरी वाजवीता 

राधा तन मन हरपी

तुच रे चित्तचोरा घनश्याम श्रीहरी

मलाही... रुप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा... राधे कृष्णा... राधे कृष्णा

राधे कृष्णा... राधे कृष्णा... राधे कृष्णा ll३ll


भेटी लागेची आस

जीवा लागे रे ध्यास

मन होई बावरे वाजे तूझी बासरी

मलाही ... रुप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा... राधे कृष्णा.... राधे कृष्णा

राधे कृष्णा... राधे कृष्णा.... राधे कृष्णा ll४ll


सोडला रे भवपाश

लागली तुझी आस

राधा भेटीस धावत जाय वृंदावनी

मलाही....रुप दर्शन दे मुरारी

राधे कृष्णा.... राधे कृष्णा.... राधे कृष्णा

राधे कृष्णा.... राधे कृष्णा..,. राधे कृष्णा ll५ll


Rate this content
Log in