देह सुगंध झाले हो
देह सुगंध झाले हो
1 min
194
आज मेघ राया नभी पहा ना..
झरुन आले हो
अंतरंग माझे सरीत सारे
भिजून गेले हो..
बाग गंधाळून
देह सुगंध झाले हो ..llधृll
बेधुंद होऊनी राया..
बहरुन आली काया
फुलपाखरु मनीचे...
लागे हो भिरभिराया
मजा लुटा राया
गंध लुटा राया
प्रीतीन आज मोहरुन आले हो
बाग गंधाळून..देह सुगंध झाली हो ll१ll
गाली चढता लाली
ज्वानी फुलून आली
घेता कवेत राया
उभी प्रेमात न्हाली
धुंद होऊन राया
मज लुटा राया
मनी लाज..आली हो..
बाग गंधाळून....
देह सुगंध झाले हो...ll२ll
