चंद्र
चंद्र
1 min
496
पौर्णिमा सरली तरी
चंद्र काही उगवेना
काय असा गुन्हा झाला
रुसवा अजुनी सरेना
दिस पाहे वाट रात्रीची
रात्र पाहे चांदण्याची
चंद्र लपला असा की
अमावस ही सरेना
थेंब थेंब जळतो जीव
नजर ही शिणली आता
एकांत दाटला गडद
चंद्र काही उगवेना
कशी करावी मनधरणी
घ्यावे काय प्रायश्चित
चुक कशी सुधारावी
मति अंधारली अशी
ग्रहण मनाचे सुटेना
चंद्र काही उगवेना
