STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

चाहूल थंडीची

चाहूल थंडीची

1 min
299

आली चाहूल थंडीची

काढा रजयी  चादर

आरोग्याला रे पोषक

बाजरीची हो भाकर....!!


कुणी शेकोटी पेटवा

करू शरीर  गरम

लाडू मेथीचे रे गोड

पोळी खाऊ या नरम....!!


आली चाहूल थंडीची

शेंगा,आवळा व बोरं

चिंचा लकडल्या खूप

दगड मारती पोरं......!!


आली चाहूल थंडीची

ऊस, हरभरा  खाऊ

गोधडीत आजीच्या रे

चला झोपाया रे जाऊ....!!


आली चाहूल थंडीची

थोडे व्यायाम ही करु

जपू आरोग्याला सारे

दूर कंटाळाला सारू.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन