STORYMIRROR

Kalpana Nagmoti

Others

3  

Kalpana Nagmoti

Others

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

1 min
23

आज बघतोय भ्रष्टाचाराचे पसरले जाळे 

भ्रष्टाचारी बघतोय सगळीकडे पैशाचे मळे

त्याला वाटतेय कधी भरेल माझे खळे

त्यात अडकतात गरीब बिचारे साधे भोळे ll1ll


भ्रष्टाचाराने केली अनेक कुटुंबे उद्ध्वस्त 

नाही राहिली कोणाला कोणाची भिस्त 

भ्रष्टाचारी जगतोय धुंदीत मस्त 

पण एक दिवस त्याचे जीवन होते नष्ट ll2ll


भ्रष्टाचार करणारा जेव्हा फसतो जाळ्यात 

त्याचे पूर्ण कुटूंब येते विळख्यात

आता तरी थांंबवा रे भ्रष्टाचाराची लत

नाही तर समाजात राहणार नाही पतll3ll


Rate this content
Log in