मराठी मास
मराठी मास
1 min
341
चैत्र मासात
गुढी पाडव्याला
नवीन वर्षाला
सारे जोशात ||१||
वैशाख मास
अक्षय तृतिया
झोके खेळूनिया
आनंद खास ||२||
जेष्ठात घेती
सुवासिनी व्रत
पौर्णिमा पाहत
वाणही देती ||३||
आषाढ आला
वारी पंढरीची
भेट विठाईची
पाऊस झाला||४||
येता श्रावण
रक्षाबंधनाला
भाऊराया आला
हर्षाचे क्षण ||५||
भाद्रपदाला
भादवा म्हणती
पितर पूजती
पितृपक्षाला ||६||