Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MEENAKSHEE P NAGRALE

Others

5.0  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

बाप

बाप

1 min
457


Date: 10 May 2019




*विषय-बाप माझा*


नाव पांडुरंग । देवाचे ठेवीले ।

नवसा पावले । विठ्ठलच ॥


बाप माझा फार। शुध्द आचरण ।

निर्मळ रे मन। सदाचिया ॥


सत्याची जाणीव । विवेकी विचार ।

ना कधी लाचार । झाले कधी॥


पेहराव छान । शुभ्र हो धोतर ।

मिशा पिळदार । हसतच॥


मुखी नाम सदा। पांडुरंग हरी।

असे वारकरी । पंढरीचे ॥


सत्याची जाणीव । मदतीचा हात।

सदैव कामात । राहतसे ॥


बाप शेतकरी । कष्टाची भाकरी ।

पांडुरंग हरी। बोलतसे ॥


आले हो भरून ।हरवली छाया ।

बापाची गं माया । माझ्यावर ॥

 

संस्काराची खाण । माणूसकी वाण ।

शंभरी हो नाणं । बाप माझा॥


कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम

*स्पर्धेसाठी अभंग*


Rate this content
Log in